Vishwas Library

Parajay Navhe Vijay

By: Vijay Falanikar

Kadambari Kadambari
0 Members read this book

स्वतःचे जीवन अत्यंत कष्टाचे गेले. पुढे सांसारिक जीवनातही मुलाचा मृत्यू पाहावा लागला. मात्र हे... दुःख विसरून अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रेमाची सावली दिली विजय फळणीकर यांनी. चित्रपटात शोभेल अशी थरारक; पण खरीखुरी जीवन काहाणी फळणीकर यांनी 'पराजय नव्हे विजय' या आत्मचरित्रात सांगितली आहे. अनाथ, निराधार मुलांसाठी त्यांनी 'आपलं घर' वसविले. यात मुलांना सर्व सोई पुरविल्या जातात. चांगले शिक्षण दिले जाते. माणूस म्हणून आवश्यक मूल्य त्यांच्यात रुजविली जातात. स्वतःचे दुःख विसरून माणुसकीवर विश्वास ठेवून फळणीकर पतीपत्नीने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. आता वृद्धांचा सांभाळही ते आपुलकीने करतात. त्यांच्या या चरित्रकथेतून सामन्य माणूस काय करू शकतो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.

Book Details

Related BooksYou May Also Like

View All